खेड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या ताफ्यात ‘फायर बुलेट’

खेड(प्रतिनिधी) नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या ताफ्यात ‘फायर बुलेट’ दाखल झाली आहे. जेथे अग्निशमन बंब पोहचू शकत नाही, अशा ठिकाणी फायर बुलेटद्वारेपोहचून आग नियंत्रणात आणणे शक्य होणार आहे.
 नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबाची कालमर्यादा संपुष्टात आली आहे. या बंबास १५ वर्षाहून अधिक वर्षांचा कालावधी लोटला असून तांत्रिक बिघाडाचे सत्र कायम आहे. अशाही स्थितीत अग्निशमन दलातील कर्मचारी आग लागणाऱ्या ठिकाणी पोहचून शर्थीचे प्रयत्न करत आहेत. नवीन अग्निशमन बंबाचा प्रस्ताव अग्नी सुरक्षा विभागाकडे पाठवणार असल्याचे संकेत नगरप्रशासनाने दिले होते. मात्र नवीन बंब कथी प्राप्त होईल याची हमी दस्तरखुद्द नगरप्रशासनही देवू शकत नाही. अशा परिस्थितीत दाखल झालेली ‘फायर बुलेट’ दिलासादायक ठरली आहे. यासाठी स्वतंत्र कर्मचारी तैनात असणार आहे. बुलेटला ५ लिटर क्षमतेची पाणी टाकी असून फवारणी यंत्र सुविधाही आहे. अद्ययावत फायर बुलेट आपत्कालीन स्थितीत किरकोळ घटना नियंत्रणात आणण्यास मोठी
भूमिका निभावणार आहे.