Breaking : पूर्णगडमध्ये सापडलेल्या १३ बांगलादेशींना ६ महिन्याची कैद

500 रुपये दंडाचीहि तरतूद; आरोपींचे लवकरच होणार प्रत्यार्पण

रत्नागिरी । प्रतिनिधी :

पूर्णगड येथे खाणीवर काम करत अनधिकृत राहणाऱ्या १३ बांगलादेशींना न्यायालयाने ६ महिन्यांची कैद सुनावली असून 500 रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या दहशतवादी विरोधी पथकाला 11 नोव्हेंबेर 2024 रोजी एक माहिती मिळाली की पूर्णगड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये भारतामध्ये अनधिकृत प्रवेश केलेले बांग्लादेशी नागरिक राहत आहेत. ह्या माहितीच्या आधारे पोलीसांनी छापा घातला असता तेथे 13 बांग्लादेशी नागरिक मिळून आले. त्यामध्ये 1)वाहिद रियाज सरदार,2)रिजऊल हुसेन कारीकर, 3) शरिफुल हौजिअर सरदार, 4)फारूख महमंद जहिरली मुल्ला, 5)हमीद मुसाफा मुल्ला, 6) राजु अहमंद हजरतअली शेख, 7)बाकीबिलाह अमिर हुसेन सरदार, 8) सैदूर रेहमान मुबारक अली, 9)आलमगीर हुसेन हिरा अबदुल कादर दलाल, 10) मोहम्मद शाहेन समद सरदार, 11) मोहम्मद नुरूझामन मोरोल बालायत अली, 12) मोहम्मद नुरहसन जहर सरदार, 13)मोहम्मद लालतू मोंदल किताब अली हे सापडले होते.

त्यांच्याकडे अधिक माहिती व तपास केला असता त्यांना भारतीय असल्याबबतचे कुठल्याही प्रकारचे पुरावे सादर करता आले नाहीत त्यावरून हे सर्व भारतामध्ये अनधिकृत रित्या प्रवेश करून रहात असल्याबबत खात्री झाली. याच आधारे रत्नागिरी पोलीस दलाने पासपोर्ट अधिनियम, परदेशी व्यक्ति अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला व या गुन्ह्याचा तपास पूर्णगड पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी रत्नदीप साळोखे यांनी केला व मुदतीमद्धे या गुन्ह्याचे दोषारोप
न्यायालयामध्ये सादर केले.

याच प्रकरणाची आज गुरुवारी 03/04/2025 रोजी सुनावणी होऊन रत्नागिरी जिल्ह्याचे मुख्य न्यायदंडाधिकारी निखिल गोसावी यांनी 13 आरोपींना प्रत्येकी 06 महीने साधी कैद व 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

प्रसंगी पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. धनंजय कुलकर्णी, यांनी या गुन्ह्या मध्ये महत्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या तपासिक अधिकारी व दहशतवादी विरोधी पथकातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्रत्येकी 1000 रुपयाचे बक्षीस जाहीर केले तसेच सर्व पथकाचे अभिनंदन केले आहे.

तसेच रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने या सर्व 13 दोषी बांग्लादेशी आरोपींना लवकरच प्रत्यार्पण करण्याबाबतची कार्यवाही देखील लवकरच संबंधित एजन्सि यांच्याकडे पाठपुरावा करून करण्यात येणार आहे व त्यांना त्यांच्या मायदेशी परत पाठविण्यात येईल.