खेडमध्ये मार्चमध्ये पाण्याचा पहिला टँकर धावण्याची चिन्हे
खेड(प्रतिनिधी) तालुक्यात यंदा मार्च महिन्यातच पाण्याचा पहिला टँकर धावणार आहे. तालुक्यातील दिवाणखवटी- सातपानेवाडीतील ग्रामस्थांना पाणीटंचाईची पहिली झळ बसणार आहे. पाणीटंचाई आराखड्यात तशी नोंदही करण्यात आली आहे. या पाठोपाठ सुसेरी-देवसडेतील २ वाड्यांना पाणीटंचाईला सामोरे...
गाडी दुरुस्तीची सबब, प्रवाशांत संताप
खेड(प्रतिनिधीं) ग्रामीण भागातून परतणाऱ्या बसफेऱ्या येथील बसस्थानका ऐवजी थेट महाडनाका येथील आगारात वळत आहेत. त्यामुळे स्थानकापर्यंत पोहचण्यासाठी प्रवाशांना अन्य बसची तासन्तास प्रतीक्षा करावी लागते. याबाबत बसफेरीमध्ये बिघाडाची. सबब पुढे केली जात असल्याने प्रवाशांचा मनस्ताप कायम...
खेड (प्रतिनिधी)नगरपरिषदेने जाहीर केलेल्या सर्वोत्कृष्ट गृहनिर्माण संस्थेसह आदर्श संकुल स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली आहे.
खेड नगरपरिषद, रोटरी क्लब, लायन्स क्लब ऑफ सिटी, जेसीज् क्लब व तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने १ मार्च ते २८ फेब्रुवारी २०२६...
महावितरणचे कार्यकारी अभियंता बाबरेकर यांची माहिती; थकबाकी वसुलीसाठी पथके तैनात
खेड(प्रतिनिधी)खेड, दापोली, मंडणगड तालुक्यात महावितरणची १ कोटी ७७ लाख रुपयांची वीजबिले थकली असल्याची माहिती महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रमोद बाबरेकर यांनी दिली. ही थकित वीजबिले वसूल करण्यासाठी तीनही तालुक्यात वीज कर्मचाऱ्यांची...
खेड(प्रतिनिधी) सीएसएमटी मुंबई येथे फलाट क्रमांक १२ आणि १३ च्या विस्तारीकरणाच्या कामामुळे तेजससह जनशताब्दी एक्सप्रेस २८ फेब्रुवारीपर्यंत दादर स्थानकापर्यंत धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले.
या कामामुळे मंगळूर-सीएसएमटी मुंबई एक्सप्रेस २८ फेब्रुवारीपर्यंत ठाणे स्थानकापर्यंत धावेल. मडगाव- सीएसएमटी मुंबई तेजस एक्सप्रेसचा...
खेड(प्रतिनिधी) बेदकारपणे वाहने चालवणाऱ्या वाहनचालकांसह दुचाकीस्वारांविरोधात येथील पोलीस निरीक्षक नितीन भोयर 'अॅक्शन मोड'वर आले आहेत. भर बाजारपेठेत राबवण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान एका तासात २२ अल्पवयीन दुचाकीस्वारांना पोलिसांनी दणका दिला. त्यांच्याकडून ३९ हजार ५०० रूपयांचा दंड वसूल केला.
शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न...
खेड (प्रतिनिधी) तालुक्यातील खोपी येथे रॉकेलने चूल पेटवत असताना गंभीररित्या भाजलेल्या ६९ वृद्धेचा कोल्हापूर येथील सी.पी.आर. रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ही वृद्धा राहत्या घरातील चूल रॉकेलने पेटवत असताना भाजली...
खेड (प्रतिनिधी) मुंबई-नालासोपारा येथे वास्तव्यास असलेल्या ५२ वर्षीय प्रौढाचा आकस्मिक मृत्यू झाला. सुनील आत्माराम भोसले असे मृत प्रौढाचे नाव आहे.
महामार्गावरून प्रवास करत असताना त्यांना श्वास घेण्याचा त्रास होवू लागल्याने उपचारासाठी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अधिक...
खेड(प्रतिनिधी) मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग लगत भरणे परिसरात जगबुडी नदी किनारी एका भंगार व्यावसायिकाने चक्क भंगार साहित्याचा भला मोठा साठा केला असून त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. भरणे ग्रामपंचायत, प्रशासकीय यंत्रणा व महसूल विभाग याबाबत मौन बाळगून...
उपोषणकर्त्यांना गाजर: आठवड्यात उपाययोजना नाहीच
खेड(प्रतिनिधी) खेड:तालुक्यातील सर्वात वर्दळीचा आला तरी दुर्लक्षित असलेल्या खेड - भोस्ते - रेल्वे स्टेशन मार्गावर पडलेले खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीस योग्य बनवावा अशी मागणी करत शेकडो रिक्षा चालकांनी प्रजास्त्तक दिनी उपोषण केले. त्यांना चार दिवसांत...