मसुरे | झुंजार पेडणेकर :प्रधानमंत्री पिक विमा योजणे अंतर्गत राज्यात कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्याना योजनेत सहभागी होण्यासाढी ३१ जुलै २०२५ अशी अंतिम तारीख होती.
तथापी गतवर्षीपेक्षा शेतकऱ्यांचा सहभाग कमी, शेतकरी ओळख क्रमांक नसणे, शासनाच्या पोर्टल सेवेतील व्यत्यय , CSC सर्व्हरवरील व्यत्यय, भुमिअभिलेख पोर्टलच्या सेवेतील व्यत्यय इत्यादीमुळे योजनेत सहभागावर होणारा परिणाम लक्षात घेवून केंद्र शासनाने दि. ०१ ऑगष्ट 2025 रोजीच्या पत्रातील निर्देशान्वये सदर योजनेत सहभाग होणेसाठी बिगर कर्जदारांसाठी दि. १४ ऑगष्ट २०२५ व कर्जदारांसाठी दि ३० ऑगष्ट २०२५ पर्यंत विशेष बाब म्हणून मुदतवाढीस मान्यता देव्यात आली आहे.
तरी योजनेत सहभाग वाढावा यासाठी कृषि विभागाने विशेष लक्ष देण्याच्या सुचना जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्रीम. भाग्यश्री नाईकनवरे यानी सर्व क्षेत्र अधिकारी/कर्मचारी यांना दिल्या आहेत. शेतकऱ्यांनी विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.












