तवसाळ तांबडवाडी मध्ये गवराई ढोल ताशांच्या गजरात आगमन

गुहागर – प्रतिनिधी
सालाबादप्रमाणे यंदाही पाचव्या दिवशी आपल्या लाडक्या गवराई आणण्यासाठी जिथं नैसर्गिक पाण्याचं स्त्रोत्र आहे. त्या ठिकाणी अनेक वर्षांपासूनची परंपरा आजही हि नवीन तरुणाई सासरवासीन जपत आहे.
यासाठी कोकणात परंपरा आहे. वडीलोपार्जीत घर मोठं घर घरी गवराई आगमन होत असतं. महिलांन सोबत पुरुष मंडळी ढोल ताशा घेऊन सार्वजनिक तळी‌ आहे या ठिकाणी येतात सोबत गवराईचे मुकुट, सोनावली, तेरडा हे निसर्गाचे वरदान असलेलं फुलझाडे याची पुजा करुन नित्य नियमाने सर्व महिला गवराई भोवती फेर धरत तिला घरी आणण्यासाठी आराधना करून पुढे वाजत गाजत घरोघरी भक्ती भावाने सुपुर्त करत नंतर गवराईला ९ वारी साडी नेसून साजशृंगार करत मनोभावे पूजा करत खणा नारळांनी ओटी भरूण दुसऱ्या दिवशी ओवसा घेऊन गेवराईला पुजतात हा मुख्य औक्षण केले जाते कोकणची संस्कृती परंपरा जपत आहेत. गौरी गणपती सोबत विसर्जन केले जाते.