सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित प्राथमिक शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

सावंतवाडी । प्रतिनिधी :सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित प्राथमिक शाळेमध्ये ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण व गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमास संस्थेच्या संचालिका श्रीमती राजश्री टिपणीस, शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रदीप सावंत, श्री. अमित सुकी, अरवारी मॅडम, टिळवे मॅडम, अमृता गवळी, रुचि कदम, बालवाडी विभागाच्या वेंगुर्लेकर मॅडम, लिपिक श्री. वैभव केंकरे तसेच शाळेचे सर्व शिक्षक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापकांनी गुलाबपुष्प देऊन केले.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना श्रीमती राजश्री टिपणीस यांनी शाळेचे शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान वाखाण्याजोगे असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी भविष्यात अधिक मेहनत घेऊन यश संपादन करावे, असे आवाहन त्यांनी केले. याच कार्यक्रमात शाळेला मिळालेल्या ‘बेस्ट स्कूल अवॉर्ड’बद्दल शिक्षक वृंदाचा गौरव करण्यात आला, तसेच मुख्याध्यापक श्री. प्रदीप सावंत यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल शिक्षक श्री. डी. जी. वरक आणि स्पर्धाप्रमुख श्रीमती राऊळ यांचा गौरव करण्यात आला. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आयोजित जिल्हास्तरीय समूहनृत्य स्पर्धेसाठी निवड झालेल्या संघाचा व मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान झाला. ज्ञानदीप संघटनेचे संस्थापक संचालक श्री. वाय. पी. नाईक यांच्या सहकार्यातून यशस्वी विद्यार्थ्यांना मेडल प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती स्वरा राऊळ यांनी केले, तर आभार श्रीमती प्राची बिले यांनी मानले. या यशस्वी आयोजनाबद्दल पालक आणि विद्यार्थी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.