राजापूर प्रतिनिधी धोपेश्वर पंचायत समिती गणातील शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार योगेश नकाशे यांनी वाडीवस्तीवर जात मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचारावर लक्ष केंद्रीत केले असून विकासासाठी या भागातील मतदारांचा आपल्याला ठाम पाठींबा असल्याचे योगेश नकाशे यांनी सांगितले.
योगेश नकाशे हे धोपेश्वर गणातुन अपक्ष म्हणुन निवडणूक लढवत आहेत. शिवसेनेने त्यांना जाहिर पाठिंबा दिला असून शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्या विजयासाठी परिश्रम घेत आहेत. धोपेश्वर गणातील प्रत्येक गावातील वाडीवस्तीवर जात नकाशे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
आपण विकासाचा मुद्दा घेऊन जनतेसमोर जात आहोत. उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत व आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली विकास करणे हाच आपला अजेंडा आहे. जनतेला आज विकास हवा आहे, आपण मतदारांपर्यंत पोहचताना जनता आपल्या भागातील, गावातील विकासाबाबतच सांगत आहे, आमची ही कामे झाली पाहिजेत अशी मागणी करत आहेत. त्यांना नक्कीच न्याय देण्याचे काम मी करेन असा विश्वास नकाशे यांनी व्यक्त केला.
या गाव व वाडीवस्तीवर प्रचारात नकाशे यांना चांगला पाठींबा मिळत आहे. आ. किरण सामंत यांच्या माध्यमातुन विविध विकास कामांना गती मिळत असल्याचेही काही गावातील ग्रामस्थ यावेळीं सांगत आहेत. योगेश नकाशे यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व खास करून युवा टीम काम करत आहे. त्यांचे कनिष्ठ बंधू महेश नकाशे हे देखील त्यांच्या प्रचारासाठी वाडीवस्तीवर पोहचत आहेत. एक अनुभवी, योजनांची माहिती असलेला उमेदवार म्हणुन योगेश नकाशे यांच्या कपबशी समोरिल बटण दाबून त्यांना विजयी करा असे आवाहन शिवसेनेच्या वतीने केले जात आहे.













