आचरा–अर्जुन बापर्डेकर
धी आचरा पीपल्स असोसिएशन संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आचरा चा बारावीच्या निकालाची यशस्वी परंपरा कायम ठेवली आहे..कला विभागात एकूण प्रविष्ठ 23विद्यार्थ्यांपैकी 21विद्यार्थी ऊत्तीर्ण होऊन निकाल 91.30टक्के लागला.तर वाणिज्य विभागात समाविष्ठ 75विद्यार्थ्यांपैकी71 विद्यार्थी पास होत94.66टक्के निकाल लागला.वाणिज्य विभागात
कस्तुरी नितीन परुळेकर हिने
81.67 टक्के गुण मिळवून प्रशालेत प्रथम येण्याचा मान मिळविला.
आकांक्षा मंदार घाडी
81.33 टक्के गुण मिळवून प्रशालेत द्वितीय तर प्रतिक सुनिल परब
81.टक्के गुण मिळवून प्रशालेत तृतीय येण्याचा मान मिळविला.
कला विभागात
बारंगळे राजश्री धनाजी
81.17 टक्के गुण मिळवून प्रशालेत प्रथम आली.द्वितीय
परब पूर्वा विश्वास 78.67टक्के तर
पुजारे प्रथमेश राजेंद्र78.33 टक्के गुण मिळवून प्रशालेत तृतीय आला.
यशस्वी विद्यार्थ्यांचे धी आचरा पीपल्स असोसिएशन चे अध्यक्ष डॉ प्रदिप मिराशी, कार्याध्यक्ष प्रदिप परब मिराशी, सचिव ऍड. आचरेकर तसेच सर्व समिती सदस्य,स्थानिक स्कूल कमेटीचे जे एम फर्नांडीस,राजन पांगे, अर्जुन बापर्डेकर,बाबाजी भिसळे, जयप्रकाश परुळेकर, अभय भोसले,मुख्याध्यापक अंकुशराव घुटूकडे उपमुख्याध्यापिका मधुरा माणगांवकर यांसह सर्व शिक्षक पालक वर्गातून अभिनंदन करण्यात येत आहे.












