नितीनराज दळवी यांचा सेवानिवृत्ती प्रसंगी सत्कार

गौरव पोंक्षे माखजन:
संगमेश्वर तालुक्यातील माखजन प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल माखजन,ॲड पी आर नामजोशी कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या नितीनराज सिताराम दळवी यांचा सेवानिवृत्ती प्रसंगी सत्कार करण्यात आला.शिक्षण संस्था व शाळा यांचे तर्फे हा सन्मान झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष शशिकांत घाणेकर होते.
नितीनराज दळवी यांनी त्यांच्या वैयक्तिक जीवनात लिपिक म्हणून ३२ वर्षे ६ महिने इतकी सेवा वाहिली.त्यांच्या निवृत्ती प्रसंगी शाळेतील शिक्षक संजय सूर्यवंशी,ओंकार नामजोशी,सचिन साठे,गणेश शिंदे,रुही पाटणकर आदिनी मनोगते व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.मुख्याध्यापक महादेव परब यांनी नितीनराज दळवी यांच्या कामाचा उल्लेख करताना तोंडभरून कौतुक केले. यावेळी संस्थेकडून उपाध्यक्ष राजेश फणसे,अध्यक्ष शशिकांत घाणेकर यांनी त्यांच्या कामाचा आढावा घेत,शुभेच्छा दिल्या.यावेळी नितीनराज दळवी याच्या सौभाग्यवती नूतन दळवी मुलगी रिया दळवी यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी जनता विद्यालय कोकरे तर्फे देखील सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला सहसचिव दीपक शिगवण,सुभाष सहस्त्रबुद्धे,मुख्याध्यापक महादेव परब,दळवी यांचे कुटुंबीय,गजानन पाटणकर,शिक्षक प्रतिनिधी अमोल पाटील,व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.कार्यक्रमांचे सूत्रसंचालन सचिन साठे यांनी तर आभार पर्यवेक्षक अंबादास घाडगे यांनी मानले.