संचालक मंडळाच्या कार्यकाळातील अंतिम सभेला संचालकांची प्रमुख उपस्थिती
रत्नागिरी:
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच रत्नागिरी येथील जयेश मंगल कार्यालयात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा संपन्न झाली. विशेष म्हणजे, विद्यमान संचालक मंडळाची ही शेवटची वार्षिक सर्वसाधारण सभा होती.
या सभेला बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव, वरिष्ठ संचालक सुधीर कालेकर, जयंत जालगावकर, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष तथा बँक संचालक अॅड. दीपक पटवर्धन यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच ज्येष्ठ संचालक रमेश दळवी, गजानन पाटील, राजेंद्र सुर्वे, अमजद बोरकर, रामभाऊ गराटे, नेहा माने आणि दिशा दाभोळकर यांच्यासह संचालक मंडळातील इतर सदस्य आणि बँकेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेत बँकेच्या वार्षिक कामकाजाचा आढावा घेण्यात आला असून, अध्यक्षांनी आपल्या भाषणात बँकेच्या प्रगतीचा आणि सभासदांच्या सहकार्याचा विशेष उल्लेख केला. संचालक मंडळाच्या या कार्यकाळातील अंतिम सभेच्या पार्श्वभूमीवर उपस्थितांनी बँकेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.












