खास.नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद आरोग्य विभागाचा उपक्रम
नांदगाव येथे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ : आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांची माहिती
वेंगुर्ले : दाजी नाईक
पालकमंत्री नितेश राणे, माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाने आणी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या आरोग्य विभागाच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार नारायणराव राणे साहेब यांच्या अमृतमहोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त ‘सिंधू जनसंवाद आरोग्य यात्रा’ हा उपक्रम हाती घेतला आहे. गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ पासून ही यात्रा सुरू होत आहे. या यात्रेचे उद्घाटन सकाळी ११ वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र, नांदगाव, ता. कणकवली येथे खास. नारायणराव राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांनी दिली.
‘सक्षम आरोग्य, समृद्ध समाज’, ‘आरोग्य सेवा आपल्या दारी’ या संकल्पनेतून तसेच ‘माझे गाव आरोग्यसंपन्न गाव’, ‘सुदृढ समाज, निरोगी समाज, सक्षम सिंधुदुर्ग’ या उद्दिष्टावर आधारित हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
*मान्यवरांची प्रमुख उपस्थिती*
या उपक्रमाच्या नांदगाव येथील उद्घाटन कार्यक्रमाला खासदार ना. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, विधानसभा आमदार दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे, विधान परिषद आमदार प्रमोद जठार तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, विधान परिषद सदस्य ना.अँड. निरंजन डावखरे, ना. ज्ञानेश्वर म्हात्रे, ना. अनिकेत तटकरे, यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
तसेच जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तुकाराम ऊर्फ दादा साईल, आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, वित्त व बांधकाम सभापती संतोष साटवळकर, समाजकल्याण सभापती श्रीमती रोहिता तांबे, महिला व बालकल्याण सभापती श्रीमती अनुराधा नारकर, पंचायत समिती कणकवलीच्या सभापती श्रीमती हर्षदा वाळके यांची उपस्थिती राहणार आहे.
जिल्हा परिषद सदस्य संतोष पारकर, मनोज रावराणे, पंचायत समिती कणकवलीचे उपसभापती राजेश सावंत, पंचायत समिती सदस्य चंद्रहास सावंत, श्रीमती मेघना चव्हाण, संतोष जठार तसेच नांदगावच्या सरपंच रविराज मोरजकर यांचीही उपस्थिती लाभणार आहे.
त्याच प्रमाणे आरोग्य विभागाचे अधिष्ठाता डॉ. अमोल शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, पंचायत समिती कणकवलीचे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पूजा काळंबे उपस्थित राहणार आहेत.
*नागरिकांसाठी आरोग्य तपासणी व विविध कार्ड सुविधा*
या आरोग्य यात्रेच्या निमित्ताने नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याबरोबरच आयुष्मान कार्ड, वयवंदना कार्ड आणि आभा कार्ड यांसंबंधी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आरोग्य सेवांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे, आरोग्याविषयी जनजागृती करणे आणि ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुविधांचा लाभ मिळवून देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे, असे प्रितेश राऊळ यांनी सांगितले. तरी या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आरोग्य तपासणी व विविध शासकीय आरोग्य योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.













