अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल
चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील पोफळी नाका येथे बेकायदा मुंबई मटका जुगार सुरू असल्याची बाब उघडकीस आल्यानंतर अलोरे-शिरगाव पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी संजय धोंडीराम बडदे (५४, रा. पोफळी नाका) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार दि. ३० ऑक्टोबर रोजी दुपारी २.२० वाजण्याच्या सुमारास पोफळी नाका येथील एमएसईसीबी गोदामाच्या भिंतीलगत ही कारवाई करण्यात आली. यावेळी संशयित आरोपी संजय बडदे हा कोणताही परवाना नसताना मुंबई मटका जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जवळ बाळगून स्वतःच्या फायद्यासाठी लोकांकडून पैसे स्वीकारत जुगार चालवित असल्याचे आढळून आले. या कारवाईत पोलिसांनी एकूण ६४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये ६४० रुपयांची रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य यांचा समावेश आहे.












