अवैध वृक्षतोड प्रकरणात वन विभाग आक्रमक

गाणे गांवात सापडला लाकडाचा अवैध साठा

चिपळूण : दिनांक १८.१०.२०२३ रोजी वनपाल चिपळूण, वनरक्षक कोळकेवाडी हे नियतक्षेत्र कोळकेवाडी अंतर्गत येणा-या मोजे गाणे ता.चिपळूण परिसरामध्ये गस्त करत असताना, मौजे गाणे गावामध्ये चिपळूण – तिबरे रस्त्याच्या बाजुला अवैरित्या वृक्षतोड करून, त्यापासून उत्पादित केलेला लाकूड माल सदर क्षेत्रामध्ये साठा करून ठेवले असल्याचे निर्देशनास आले. सदर प्रकरणी वनपाल चिपळूण यांनी महाराष्ट्र झाडेतोडण्याबाबत अधिनियम (विनियमन) १९६४ अंतर्गत जमिन मालक यांचेविरूध्द अवैध वृक्षतोडीचा गुन्हा नोंद केला आहे. तसेच तसेच अवैधरित्या साठा करून ठेवलेला लाकूड मालाची मोजमापे घेवून, सदरचा ५४.०५० घ.मी. लाकूड माल जप्त करून ताब्यात घेतला आहे. सदर प्रकरणी पुढील तपास वृत्त अधिकारी तथा परिक्षेत्र वन अधिकारी चिपळूण यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल चिपळूण, वनरक्षक कोळकेवाडी करत आहेत.

सदरची कार्यवाही मा. विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) श्री. दिपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक (प्रा.) रत्नागिरी (चिपळूण) श्री. वैभव बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली श्रीम. राजश्री कीर, वृक्ष अधिकारी तथा परिक्षेत्र वन अधिकारी, श्री.दी. रा. भोसले, वनपाल चिपळूण, श्री. राहुल गुंढे, वनरक्षक कोळकेवाडी यांनी पार पाडली आहे.