माखजन |वार्ताहर
संगमेश्वर तालुक्यातील माखजन परिसरात सध्या शिमगोत्सवाची धूम पाहायला मिळत आहेत.विविध गावांमध्ये शिमगोत्सवाचे खेळे बाहेर पडले आहेत.शिमग्यापुर्वी घरोघरी खेळे जाण्याची परंपरा आहे.
माखजन परिसरात प्रत्येक गावात फाक पंचमी पासून वाडी वाडीवर होळी लावली जात आहे.अनेक गावात पौर्णिमेला चंद्रदर्शनाने गावचा होम लागतो. माड उभा केला जातो. त्यानंतर सहाण पायरी येथे पालखीचे आगमन होते.तर काही गावात भद्रेचे शिमगे साजरे होतात.गावाच्या व्याप्ती नुसार ग्रामदैवतेची पाळखी गाव भोवणी ला फिरते.गाव भोवणी झाल्यावर शिंपणे होते.त्यानंतर पालखी गाव देवळात जाते.
शिमगोत्सवा दरम्यान गावोगावी,मुंबई पुणे येथून चाकरमानी मोठ्या संख्येने येतात.सुमारे १५ दिवस चालणाऱ्या ह्या शिमगोत्सवाने गावा गावात एकोपा राखला जातो.










