आपला लांजा कोकणचा राजा हे अल्बम साँग लांजा येथे होणार रिलीज 

लांजा( प्रतिनिधी)            कोकणातील निसर्गरम्य व ऎतिहासिक पार्श्र्वभूमी लाभलेल्या लांजा तालुक्यावर ” येणा-या बहुचर्चित “आपला लांजा कोकणचा राजा ” या मराठी अल्बम साँगचा रिलिज सोहळा कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय लांजाच्या सभागृहात गुरुवार दिनांक २१ मार्च रोजी सकाळी ११:००

रत्नसिंधू योजनेचे सदस्य किरणशे सामंत यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

 

कोकणातील स्वर्गीय सुंदर लांजा तालुक्याचा ,इथल्या समृद्ध निसर्गाचा प्रसार करण्यासाठी स्थापिलेल्या लवेबल लांजा या संस्थेच्या वतीने समृद्ध सुंदर लांज्याचा प्रसार करण्यासाठी ‘माझा लांजा कोकणचा राजा’ हे अल्बम साँग तयार करण्यात आले असुन लांजा तालुक्यावर प्रथमच येणा-या ‘आपला लांजा कोकणचा राजा’ या मराठी अल्बम साँगच्या रिलिज सोहळ्यासाठी न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जयवंत शेट्ये,सी.ई.अो.भाऊ वंजारे,संचालक महंमद रखांगी,रत्नागिरी जिल्हा समन्वय समिती सदस्य सुनिल कुरुप,नगराध्यक्ष मनोहर बाईत, प्रसिद्ध रंगकर्मी सचिन काळे ,सुनिल बेंडखळे ,ईलाईट डेव्हलपर्सचे प्रमुख समिर घारे,नगरसेवक नंदराज कुरुप, अभिनेत्री सायली सपकाळ ,किशोर साळुंखे, प्राचार्य डाॅ.कुलकर्णी सर आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 

हे गीत गुरुवार दि.२१ मार्च रोजी साईस्वर म्युझिक या युट्युब चॅनेलवर आपल्या भेटिला येत असुन याची निर्मिती लांज्याच्या पर्यटन विकासासाठी काम करणारी लवेबल लांजा या संस्थेचे पदाधिकारी अभिजित राजेशिर्के,विनय बुटाला ,विजय हटकर, महेश बामणे व आशीष रेऊरकर यांनी मेहनत घेतली अाहे. आपला लांजा कोकणचा राजा हे गीत गीतकार सचिन डांगळे यांनी रचले असुन या गीताचे गायन सुप्रसिद्ध गायक केवल वाळंज यांनी केले आहे.तर कथा दिग्दर्शन स्वप्नील जगताप यांचे आहे.संगीत आकाश शेजळे यांचे असून डीओपी म्हणून लांजा येथील सुप्रसिद्ध छायाचित्रकार विनय बुटाला आणि साईप्रसाद पिलणकर,नृत्य दिग्दर्शक – अनिकेत जाधव,रंगभूषा – तेजश्री पिलनकर,कला दिग्दर्शक – अजित गोसावी , नितीन कारेकर यांनी काम पाहिले आहे.

 

या गाण्याचे चित्रीकरण लांजा तालुक्यातील विविध पर्यटन स्थळे,लांजा शहर व महाविद्यालय परिसरात झाले असुन या गाण्यात मुख्य भुमिकेत नवोदित अभिनेता किशोर साळुंके व सायली सपकाळ झळकणार आहेत.अनेक स्थानिक कलाकारांना यामध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे.यामध्ये नंदराज कुरूप,अनुष्का गोसावी,अंकिता कुंभार , दिया कडू ,पूर्वा कोपरे,सुंदर जाधव हे नवोदित कलाकारहि झळकले आहेत. या बहुचर्चित गीताची लांजावासीय आतुरतेने वाट पहात असुन स्वर्गीय सुंदर कोकणातील लांज्याचे नाव महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर जाण्यासाठी या गाण्याने मदत होणार आहे.