दोडामार्ग तालुका माध्यमिक शालात परीक्षा निकाल 98.36 टक्के

दोडामार्ग | सुहास देसाई : दोडामार्ग तालुक्यातील माध्यमिक शालात परीक्षा निकाल ९८.३६ टक्के लागला आहे तालुक्यांत प्रथम करुणा सदन इंग्लिश मीडियम स्कूल साटेली-भेडशी या प्रशालेचा विद्यार्थी अथर्व संदीप गवस याने ९५ टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. याच प्रशालेतील विद्यार्थिनी प्रणिता कैलास पालवे ९४.६० टक्के गुण मिळवत द्वितीय तर दोडामार्ग इंग्लिश स्कूल दोडामार्ग या प्रशालेची विद्यार्थिनी वेदिका कृष्णा नाईक ९४.४० टक्के गुण मिळवत तालुक्यात तृतीय आले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
दोडामार्ग तालुक्यातील शाळानिहाय प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे विद्यार्थी पुढिलप्रमाणे,

१)नवदुर्गा माध्यमिक विद्यालय आयी १०० टक्के – प्रथम संकेत कृष्णा पर्येकर ८४ टक्के, द्वितीय जाई लाडू पर्येकर ८०.४० टक्के व तृतीय संजना महादेव येळुस्कर ७८.४० टक्के
२) नुतन विद्यालय कळणे १०० टक्के – प्रथम पूर्वा शिवराम परब ९२ टक्के, द्वितीय विग्नेश गोविंद गवस ८७ टक्के व तृतीय यश्मीता शंकर पिळणकर ८६.६० टक्के
३)समाजसेवा हायस्कूल कोलझर १०० टक्के- प्रथम जयेश मनोज कुमार देसाई ९१.६० टक्के, द्वितीय प्रगती प्रवीण गवस ८८.२० टक्के व तृतीय मिथिला अनिल कोलते ८८ टक्के
४) करुणा सदन इंग्लिश मेडियम स्कूल साटेली-भेडशी १०० टक्के – प्रथम अथर्व संदीप गवस ९५ टक्के, द्वितीय प्रणिता कैलास पालवे ९४.६० टक्के व तृतीय दत्ताराम धोंडू सावंत ८८.२० टक्के
५) बापूसाहेब देसाई विद्यालय उसप १०० टक्के – प्रथम नंदा लक्ष्मण गवस ९४ टक्के, द्वितीय अंतरा प्रसाद रेडकर ८५ टक्के व तृतीय सलोनी संतोष केरकर ८४.८० टक्के
६) सरस्वती विद्यामंदीर व ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स कुडासे १०० टक्के – प्रथम श्रेया सुनील सांगुर्डेकर ८८.६० टक्के, द्वितीय सोनम रामचंद्र जंगले ८५.८० टक्के व तृतीय पल्लवी संदीप सिन्नारी ८२.२० टक्के
७) किर्ती विद्यालय घोटगेवाडी १०० टक्के- प्रथम कुंदा गोविंद धुमास्कर ८६.८० टक्के, द्वितीय तन्मय गुरुदास दळवी ७९.८० टक्के व तृतीय मनीष हरी देसाई ७५.४० टक्के
८) माध्यमिक विद्यालय सोनावल १०० टक्के – प्रथम सोनल गंगाराम झोरे ९१.६० टक्के, द्वितीय गौरी प्रकाश नाईक ८६ टक्के व तृतीय नूतन संजय च्यारी ८४ टक्के
९) एम. आर. नाईक विद्यालय कोनाळकट्टा १०० टक्के – प्रथम तनिष्का संजय केसरकर ८८.६० टक्के, द्वितीय सोहम संतोष लोंढे ८७.६० टक्के व तृतीय विभागुन प्रताप चंद्रकांत लोंढे आणि राहुल रामा सावंत ८७ टक्के
१०) माध्यमिक विद्यालय मांगेली १०० टक्के – प्रथम सर्वेश श्रीदास मोरगावकर ९३ टक्के, द्वितीय विठ्ठल ज्ञानेश्वर गवस ७८.४० टक्के व तृतीय सविता जगन्नाथ गवस ७५.६० टक्के
११) शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकुळे १०० टक्के- प्रथम प्राजक्ता संतोष गवस ८७ टक्के, द्वितीय अदिती राजेश्वर नाईक ८२.६० टक्के व तृतीय विभागून गौरी सुनील नाईक आणि गायत्री गंगाधर गवस ८०.४० टक्के
१२)माध्यमिक विद्यालय झोळंबे १०० टक्के- प्रथम विभागून अश्वेक आनंद गवस व जयश्री शशिकांत राऊळ ८१.४० टक्के, द्वितीय सानिया गुरुनाथ झोळंबेकर ८० टक्के व तृतीय रविना विष्णू देसाई ७४.८० टक्के
१३)न्यू इंग्लीश स्कूल भेडशी ९७.५६ टक्के – प्रथम अनुज जयवंत शिंदे ८७.०७ टक्के, द्वितीय सौम्या संदेश मणेरकर ८४.४० टक्के व तृतीय साक्षी विष्णू घोगळे ८३.८० टक्के
१४) माध्यमिक विद्यालय झरेबांबर ९६.६६ टक्के – प्रथम कृपाली नवनाथ गवस ८०.६० टक्के, द्वितीय गौरवी सूर्याजी गवस ८०.४० टक्के व तृतीय औदुंबर प्रमोद नाईक ७८.४० टक्के
१५) दोडामार्ग इंग्लिश स्कूल दोडामार्ग ९६.२२ टक्के – प्रथम वेदिका कृष्णा नाईक ९४.४० टक्के, द्वितीय मृदुला दीपक देसाई ९१.४० टक्के व तृतीय सृष्टी प्रसन्ना देसाई ८९ टक्के
१६)माध्यमिक विद्यालय माटणे ९० टक्के – प्रथम अभिजीत संजय पिरणकर ८८ टक्के, द्वितीय गौतमी साजू गवस ८२.४० टक्के व तृतीय संध्या शंकर वरक ८० टक्के
श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकुळे प्रशालेचा सलग दहा वर्षे १००% निकालाची पंरपरा कायम
धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुबई या संस्थेच्या संचलित श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकुळे प्रशालेचा इ. दहावी निकाल यावर्षी सलग दहाव्या वर्षी १००% निकालाची पंरपरा कायम राखली आहे याबद्दल प्रशालेचे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुबईचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरसकर सचिव श्रीम. कल्पनाताई तोरसकर समन्वय समिती सचिव सौ. रश्मी तोरसकर सहसचिव नंदकुमार नाईक आदींनी अभिनंदन केले आहे प्रशालेत यशस्वी विद्यार्थाचे अभिनंदन गुलाबपुष्प देऊन मुख्याध्यापिका स्नेहल गवस यानी केले आहे
या प्रशालेतील एकुण विद्यार्थी १४विद्याथी प्रविष्ट झाले होते त्यापैकी 14पास झाले आहे त्यामुळे निकाल 100% लागला आहे यामध्ये प्रशालेत
प्रथम श्रेणी १३व दवतिय श्रेणी१ अशा निकाल लागला आहे
सर्व यशस्वी विद्यार्थाचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे