कोट ग्रामपंचायत येथे टीबी मुक्त मोहिम उत्साहात

रत्नागिरी /वार्ताहर

लांजा तालुक्यातील कोट ग्रामपंचायत टिबी मुक्त मोहिमेच्या अनुषंगाने ग्रामस्थांची एक्स रे तपासणी करण्यात आली.यावेळी उपस्थित अधिकारी-कर्मचारी यांचे स्वागत ग्रामपंचायत अधिकारी श्री.विक्रांत वि.साळवी यांनी केले.श्री.दत्ताराम गोरुले (पोलिसपाटील)श्री.निवृत्ती वाकडे,श्री. प्रकाश घडशी यांनी कार्यक्रमास विशेष सहकार्य केले.
ग्रामस्थांना या शिबीरामध्ये BP,शुगर,रक्त,लघवी,स्पुटम तपासणी इत्यादी मोफत सेवा देण्यात आल्या.सदर कार्यक्रम ग्रामपंचायत सरपंच मा.श्रीम. निशिगंधा नं.नेवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.यावेळी आरोग्य निरीक्षक श्री.डी.व्ही.गुरव यांनी कीटकजन्य व जल जन्य आजाराबाबत घ्यायवाच्या काळजीबाबत मार्गदर्शन केले.या शिबिरास DPS श्री.एन.वाय.सुर्वे साहेब,PPM श्री.श्रीकांत सावंत साहेब,श्री.निलेश हंगे(एक्स रे टेक.),श्री.मिलिंद संसारे सर(STS),श्री.व्ही.एस.कामत(वैद्यकीय अधिकारी)प्रा.आ.केंद्र वाडीलिंबू,श्री.एम.बी.येसरे (CHO),गटप्रवर्तक श्रीम.एस.एस.लोटणकर,श्रीम.एम.एम.आग्रे(ANM),श्री.एस.एम.सोळंकी(MPW),श्री.एस.ए.कांबळे(MPW), श्री.पंकज कालकर(Lab.Assi.),वाडीलिंबू कार्यक्षेत्र आशाताई,कोट ग्रामपंचायत कार्यक्षेत्र अंगणवाडी व मदतनीस,ग्रामपंचायत कर्मचारी, माजी उपसरपंच श्री.संजय पाष्टे,सामाजिक कार्यकर्ते व कोट-आगरगाव ग्रामस्थ आदी उपस्थित होते.