आवळेगाव येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

कुडाळ l प्रतिनिधी :आवळेगाव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित हायस्कूल व कला-वाणिज्य उच्च माध्यमिक विद्यालय, आवळेगाव येथे दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. दशरथ काळे सर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी संस्थेचे सदस्य व संचालक मा. प्रशांत सावंत, सर्व गुरुजन, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात मुख्याध्यापक श्री. दशरथ काळे सर यांनी सावित्रीबाई फुले यांचा प्रेरणादायी संघर्ष व शिक्षणासाठी दिलेले योगदान विद्यार्थ्यांसमोर मांडले. तसेच शिक्षक श्री. जी. बी. कांबळे सर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा सविस्तर आढावा घेतला.

यावेळी मार्गदर्शन करताना संस्था सदस्य मा. प्रशांत सावंत यांनी, “सावित्रीच्या लेकींनी सावित्रीबाई फुले यांना आदर्श मानून शिक्षण, सामाजिक, प्रशासकीय, क्रीडा व विविध क्षेत्रांत उज्ज्वल यश संपादन करावे,” असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती कुंभार मॅडम यांनी केले, तर श्रीकृष्ण सावंत सर यांनी आभार प्रदर्शन केले. संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.