जखमी तरुणाला जिल्हा रुग्णालयात केले दाखल
रत्नागिरी ः प्रतिनिधी
कोकण रेल्वेने मुंबईला जाणारा प्रवासी तरुण कुवारबाव-आरटीओ ऑफिस जवळील रेल्वे रुळावर पडला. त्याच्या डोक्याला व हातापायांना दुखापत झाली. उपचारासाठी रेल्वे पोलिसांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. ही घटना रविवार 17 मे रोजी सकाळी 8 वा.सुमारास घडली.
समीर मंगेश आडिवरेकर (३८, रा. तुलसवडे, ता. राजापूर, रत्नागिरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. समीर आडिवरेकर हा कोकण रेल्वेने राजापूर ते मुंबई असा प्रवास करत होता. कुवारबाव आरटीओ ऑफिस रेल्वे रुळावर त्याचा रेल्वेच्या दरवाजातून तोल जावून तो धावत्या रेल्वेतून खाली पडला. त्याच्या डोक्याला व हातापायांना दुखापत झाली. रेल्वे पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी त्याला उपचारासाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत अपघाताची नोंद करण्यात आली आहे.












