मेर्वी-खरडेवाडी येथे घराशेजारील विहिरीत पडून ८० वर्षीय वृद्धेचा मृत्यू

रत्‍नागिरी ः प्रतिनिधी
तालुक्यातील मेर्वी-खरडेवाडी येथील वृध्देचा पाय घसरुन ती घराशेजारील विहिरीत पडल्याने तिचा मृत्‍यू झाला.ही घटना मंगळवार 16 जून रोजी सकाळी 6 ते 6.30 वा.कालावधीत घडली आहे.
गोपीका पांडूरंग खरडे (80,रा.खरडेवाडी मेर्वी,रत्‍नागिरी) असे विहिरीत बुडून मृत्‍यू झालेल्या वृध्देचे नाव आहे. त्‍या आजारी होत्‍या. मंगळवारी सकाळी त्‍या घरातील बाथरुममध्ये जात असल्याचे सांगून गेल्या होत्‍या. बराच वेळ झाला तरीही त्‍या बाहेर न आल्याने त्‍यांचा मुलगा दिलीप खेरडे याने बाथरुममध्ये जाउन पाहिले असता त्‍या त्‍याठिकाणी नव्हत्‍या. म्हणून त्‍याने घराच्या आजूबाजूला शोध घेतला असता त्‍याला घराशेजारी असलेल्या विहिरीत पाण्यात पाण्यात तरंगताना दिसून आल्या. त्‍यांना विहिरीतून बाहेर काढून जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत पूर्णगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्‍यूची नोंद करण्यात आली आहे.