राष्ट्रीय स्वयंसेवक संघा कडून माखजन हायस्कुल मध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा

गौरव पोंक्षे माखजन:
संगमेश्वर तालुक्यातील माखजन इंग्लिश स्कूल येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून गुरुपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक दिलीप जोशी,अनिल चव्हाण उपस्थित होते.यावेळी त्यांनी गुरुजनानप्रती आदर व्यक्त करत,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.यावेळी मुख्याध्यापक महादेव परब,पर्यवेक्षक अंबादास घाडगे,रुही पाटणकर,ओंकार नामजोशी आदी उपस्थित होते.
दरवर्षी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे शुभेच्छा दिल्या जातात.