आबलोली (वार्ताहर):
गुहागर तालुक्यातील आबलोली गावचे सुपुत्र आणि माजी सरपंच प्रमेय प्रदीप आर्यमाने यांनी प्रामाणिकपणे केलेली नि:स्वार्थ जनसेवा आज फळाला आली असून ज्या व्यक्ती साठी ही नि:स्वार्थ जनसेवा केली त्या व्यक्तीनेही आठवणीने प्रमेय प्रदीप आर्यमाने यांची जाणीव ठेवून जाहीर सत्कार करून पाठ थोपटली त्यामुळे प्रमेय प्रदीप आर्यमाने यांना आपण कुठलीही प्रकारची अपेक्षा न करता नि :स्वार्थ पणे केलेल्या कामाची पोच पावती मिळाली आहे
आबलोली गावातील खालील पागडेवाडी येथील रहिवाशी बाळू पागडे यांना घर बांधायचे होते. हे घर ज्या ठिकाणी बांधायचे होते. त्या घराच्या जागेवरून महावितरणची वीज वाहिनी गेली होती. ही वीज वाहिनीची लाईन शिफ्ट करायची होती. यासाठी बाळू पागडे आणि पागडेवाडीतील प्रमुख ग्रामस्थांनी सदरील वीज वाहिनीची लाईन शिफ्ट करण्यासाठी प्रमेय प्रदीप आर्यमाने यांना भेटून सांगितले.
सदरील काम महावितरचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधून महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मोफत करुन दिले. त्यामुळे बाळू पागडे यांचे घराचे काम पूर्ण झाले. प्रमेय प्रदीप आर्यमाने यांनी महावितरण कंपनी कडून हे काम मोफत पूर्ण करुन दिल्याने बाळू पागडे यांनी त्यांच्या नूतन वास्तू शांती कार्यक्रमात आठवणीने बोलवून प्रमेय प्रदीप आर्यमाने यांचा जाहीर सत्कार केला. प्रमेय आर्यमाने नि:स्वार्थ जनसेवा नावाचा हॉट्सप ग्रुप चालवतात आणि त्याप्रमाणे ते नि :स्वार्थ जनसेवा करतात या त्यांच्या नि :स्वार्थ जनसेवे बद्दल आबलोली गावातून प्रमेय आर्यमाने यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे












