जमीन जागेच्या वादातून मारहाण आणि शिवीगाळ, तिघेजण जखमी

परस्पर विरोधी तक्रारी दाखल, शिपोशी जाधववाडी येथील घटना

लांजा( प्रतिनिधी): जमीन जागेच्या वादातून शेजारी शेजारी राहणाऱ्या दोघांमध्ये भांडण होऊन एकमेकांना मारहाण शिवीगाळ केल्याची घटना शिपोशी जाधव वाडी येथे बुधवारी 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास घडली असून यामध्ये तिघेजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी दाखल झालेल्या परस्परविरोधी तक्रारीनुसार लांजा पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीकांत धोंडू जाधव (वय एका 55 राहणार शिपोशी जाधववाडी ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास राहते घरासमोर आपला मुलगा श्रवण हा कामाला जात नसल्याने त्याला राग मनात धरून पत्नी व मुलगा यांना शिवीगाळ करत होते. तसेच संजय शंकर डाफळे याने वडिलांकडून जमीन बसवून घेतले असे बोलत असताना त्याचा राग मनात येऊन संजय डाफळे याने श्रीकांत जाधव यांना तू भाई झाला आहेस का असे बोलून त्यांना शिवीगाळ केली दमदाटी करून आपल्या हातातील काठीने त्यांच्या डोक्यावर पाठीवर मारले तसेच पत्नी सौ श्रावणी ही भांडण सोडवण्यासाठी गेली असता तिचे हाताला पायाला काठी लागून लहान मोठी दुखापती केल्या. या घटनेत दोघे पती-पत्नी जखमी झाले.
या मारहाण प्रकरणी श्रीकांत जाधव यांनी लांजा पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनुसार लांजा पोलिसांनी संजय डाफळे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 118(1), 115(2), 352, 351(2), 131 प्रमाणे तसेच भा द वि कलम 324, 323, 504, 506, 352 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
तर या घटने प्रकरणी संजय शंकर डाफळे ( वय 52, राहणार शिपोशी जाधववाडी ) यांनी केलेल्या फिर्यादीनुसार श्रीकांत धोंडू जाधव हा दिनांक 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास दारू पिऊन संजय डाफळे यांना शिवीगाळी व ठार मारण्याची धमकी देत होता. याबाबत विचारणा केली असता तसेच आपल्या मालकीची गुरे गोठ्यात बांधून घरी जात असताना श्रीकांत जाधव याने संजय डाफळे यांच्या पाठीमागून डोक्यात कोयती मारून दुखापती केल्या. यामध्ये ते जखमी झाले.
या घटने प्रकरणी संजय डाफळे यांनी केलेल्या तक्रारीनुसार लांजा पोलिसांनी श्रीकांत जाधव यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 118(1), 115(2), 352, 351(2), 131 प्रमाणे तसेच भा द वि कलम 324, 323, 504, 506, 352 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल उर्मिला शेडे या करत आहेत.