एस.एस.पी.एम. कॉलेज, कणकवली – ‘व्हर्च्युओसीक २०२५’ टेक फेस्टचे भव्य उद्घाटन!

सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटन

१.५ लाखांची बक्षिसे; उत्स्फूर्त प्रतिसाद

विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून टेक्नॉलॉजी अवगत करावी – पोलिस अधीक्षकांचे आवाहन

एस एस पी एम कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, कणकवली चे प्राचार्य डॉ. डी. एस. बाडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रिय मंत्री व विद्यमान खासदार सन्मा. नारायणराव राणे साहेब यांनी जिल्हयाची शैक्षणीक गरज ओळखुन सन १९९८-९९ मध्ये स्थापन केलेल्या एस. एस. पी. एम. कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कणकवली मध्ये काळाची गरज ओळखुन, दुरदृष्टी ठेऊन सन २०१२ साली “व्हर्च्युओसीक” ची संकल्पना सध्याचे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री सन्मा. नितेशजी राणे साहेब यांनी मांडली. जेणेकरुन कोकणातील विद्यार्थ्यांनी सध्या चालु असलेल्या टेक्नॉलॉजिशी अवगत व्हावे हा त्यामागचा प्रमुख उददेश होता. मागील १३ वर्षे कोरोना कालावधी वगळता, “व्हर्च्युओसीक” या टेक्निकल फेस्टीव्हलचे आयोजन एस. एस. पी. एम. कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कणकवली मध्ये केले जाते.
दिनांक ३ एप्रिल २०२५ रोजी भव्य अशा दहाव्या ,व्हर्च्युओसीक २०२५ या टेक्निकल फेस्टीव्हलचे चे उदघाटन सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक मा. सौरभकुमार अग्रवाल यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या प्रसंगी बोलताना त्यांनी ते स्वतः इंजिनीयर बनत असतानाच्या आठवणींना उजाळा दिला. विद्यार्थ्यांनी व्यसनांच्या आहारी न जाता नवीन नवीन टेक्नॉलॉजी अवगत करून देशाच्या विकासात हातभार लावण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित असलेल्या, होऊ घातलेल्या अभियंत्यांना केले. या प्रसंगी कणकवली पोलिस ठाणे अधीक्षक उपनिरीक्षक श्री. शरद देठे हे ही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी पाहुण्यांचे स्वागत करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. बाडकर यांनी व्हर्च्युओसीक सुरू करण्यामागची संकल्पना विषद केली.

एस. एस. पी. एम. कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कणकवली येथे सुरू झालेल्या व्हर्च्युओसीक २०२५ मध्ये सुमारे १.५ लाखांची बक्षिसे विवीध स्पर्धांसाठी ठेवण्यात आली आहेत. यामध्ये इव्होल्युशन – राष्ट्रीय स्तरावरील पेपर प्रेझेंटेशन, प्रोजेक्ट एक्झिबीशन, डिबेट, पोस्टर प्रेझेंटेशन, रोडीज, हॅकस्प्रिंट, रोबोटीक्स, डिरेक्टो व लॅनगेंमींग अशा विवीध स्पर्धांचे एकाच मंचावर आयोजन केले आहे. या कार्यक्रमामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोवा व कर्नाटक मधील इंजिनियरिंग डिग्री व डिप्लोमा कॉलेज मधील ३५५ विद्यार्थ्यांनी विवीध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी केली आहे.

या उद्घाटन कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी प्रतिनिधी कुमारी अपूर्वा पालेकर, सांस्कृतिक प्रतिनिधी चिन्मय केनवडेकर, व्हर्च्युओसीक विद्यार्थी समन्वयक कुमार मंदार कुलकर्णी, जनरल सेक्रेटरी कुमार विनय कदम, सहासंयोजक प्रा. व्ही. व्ही. माईणकर, संयोजक प्रा. टी. एस. मालपेकर, महाविद्यालयाच्या सर्व विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन कुमारी भार्गवी कवटकर व कुमार प्रसाद गवाणकर यांनी केले.