रत्नागिरी : सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेच्या वतीने नुकताच वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला. शहरातील सावंत उद्यान येथे हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला होता. शाखेसाठी कदंब, रुई, अशोक, आपटा अशी विविध प्रकारची झाडे प्रदीप दिवेकर यांनी योगेश्वरी नर्सरीमधून मोफत उपलब्ध करून दिली. वृक्षारोपणाला शाखेचे अध्यक्ष सीए मंदार जोशी, उपाध्यक्ष सीए केदार करंबेळकर, सीए मंदार देवल, सामाजिक कार्यकर्ते समीर करमरकर, सोनल आंब्रे, महेश आंब्रे उपस्थित होते.












