तायक्वांदो बेल्ट ग्रेडेशन परीक्षेमध्ये संगमेश्वरच्या तायक्वांदो पट्टूंचे सुयश

देवरूख (प्रतिनिधी):

संगमेश्वर तालुका तायक्वांदो अकॅडमी व रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नगरपंचायत देवरुख तायक्वांडो क्लब, दळवी वृंदावन देवरुख या ठिकाणी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष राज्यसंघटना खजिनदार वेंकटेश्वरराव कर्रा व तालुका सचिव प्रमुख प्रशिक्षक शशांक घडशी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली बेल्ट ग्रेडेशन परीक्षा मोठ्या उत्साहात संपन्न झाली

यावेळी नगरपंचायत देवरुख तायक्वांडो क्लब अध्यक्षा अकॅडमीच्या उपाध्यक्षा सौ. स्मिता लाड, माजी नगरसेवक प्रफुल्ल भुवड,क्लब उपाध्यक्ष संदेश जागुष्टे,पालक प्रतिनिधी अदिती लोध,प्रशिक्षक स्वप्निल दांडेकर, साईप्रसाद शिंदे, सुमीत पवार, मयुरी राऊत, करण जाधव आदी उपस्थित होते. या बेल्ट ग्रेडेशन परिक्षेसाठी नगरपंचायत देवरुख तायक्वांडो क्लब, व लायन्स तायक्वांडो क्लब संगमेश्वर या क्लबच्या खेळाडूंनी सहभाग नोंदविला या परीक्षेत अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत सर्वच खेळाडूंनी ए ग्रेड मध्ये परीक्षा उत्तीर्ण केली या बद्दल क्लबचे प्रशिक्षक स्वप्निल दांडेकर, सुमित पवार, साईप्रसाद शिंदे, मयुरी राऊत, करण जाधव यांचा जिल्हा संघटना अध्यक्ष राज्य संघटना खजिनदार वेंकटेश्वरराव कर्रा यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

यशस्वी खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे

येलो बेल्ट- सतेज मांगले, दर्शिल सावंत, अन्वी माने, ईश्वरी जाधव, अदनान फुलारी, सलोनी सनगले, प्रज्ञेश वाघमोडे, सई तावडे, तनुष पेडणेकर, प्रणया कांबळे, श्राव्या जाधव, आस्था वाजे, अर्णव सुर्वे, अंश पवार, अर्णव बंडबे, साईश सावंत.

ग्रीन बेल्ट – शुभ्रा माळी, सांची मुंडेकर, अवनी भिंगार्डे, शरणी कोळवणकर, गंधार रेवडेकर, प्रभात रहाटे.

ग्रीन-वन बेल्ट – प्रचिती कदम, मिहिका लाड, सान्वी जाधव, शौर्य पेडणेकर, शौनक राजवाडे, रितीशा कांगणे, ईश्वरी कांगणे, निकुंज घडशी.

ब्ल्यु बेल्ट- पुर्वा रहाटे, जिविता देशपांडे, भुमिका शिंदे, ओमराजे महाडिक.

ब्ल्यु-वन बेल्ट – शुभ्रा सुर्वे, अन्वय कोळवणकर, सई संसारे, मृणल जाधव, विदिशा जाधव, तनिष्का कांगणे.

रेड बेल्ट – आर्यन यादव, यश तांबे, आरोही तांबे, स्वानंदी कांगणे, सोहम चव्हाण, शर्विल कांगणे.

रेड-वन बेल्ट – ईशान भागवत, ऋत्विक कांगणे, प्रथमेश शेट्ये, वेद पटेल, शौर्या वाघमोडे.

या सर्व यशस्वी तायक्वांडोपट्टुंना तालुका अँकॅडमीचे अध्यक्ष व माजी आमदार डॉ. सुभाष बने, माजी राज्यमंत्री रविंद्र माने, तालुक्याचे आमदार शेखर निकम, देवरुख शहराच्या नगराध्यक्षा सौ.मृणाल शेट्ये, उपनगराध्यक्ष वैभव पवार,नगरपंचायतचे, मुख्याधिकारी प्रशांत भोसले,जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, क्लब अध्यक्षा सौ.स्मिता लाड,माजी उपनगराध्यक्ष अभिजीत शेट्ये, तालुका अकॅडमीचे उपाध्यक्ष परेश खातू ,अकॅडमी खजिनदार चिन्मय साने, लायन्स तायक्वांदो क्लब अध्यक्ष दिलीप रहाटे,क्लब उपाध्यक्षा ॲड.सौ.पुनम चव्हाण,सामाजिक कार्यकर्ते युयुत्सुु आर्ते, क्लब सदस्या स्वाती नारकर, रुपाली कदम,अनुजा नार्वेकर,अण्णा बेर्डे, दत्तात्रय भस्मे,सिनियर खेळाडू निखिल लाड,सौरभ वनकर, पंकज मेस्त्री, मृणाली सार्दळ, प्रथमेश शेट्ये, संकेत मापुस्कर,गायत्री शिंदे, सानिका प्रसादे, सुशांत मेस्त्री,सिद्धी केदारी, वेदांत गिडीये व सर्व नगरसेवक आदींनी शुभेच्छा दिल्या.