ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सागरी किनारपट्टीसाठी उच्च लाटांचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानुसार, ३.५ ते ३.८ मीटर उंच लाटा येण्याची शक्यता आहे.
हा इशारा १८ जून २०२५ रोजी सायंकाळी ५:३० वाजल्यापासून ते १९ जून २०२५ रोजी रात्री ११:३० वाजेपर्यंत लागू राहणार आहे.
या कालावधीत लहान बोटींना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच किनारपट्टीजवळील पर्यटन आणि जलक्रीडा पूर्णपणे थांबवण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे. स्थानिक नागरिक आणि पर्यटकांनी प्रशासनाच्या सूचना काटेकोरपणे पाळाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.












