चिपळूणमध्ये दिसून आलं राजकीय संस्कृतीच दर्शन

निमित्त ठरले माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे आयोजित स्नेहभोजन

चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूणमध्ये एका कार्यक्रमानिमित्त राजकीय विरोधक असणाऱ्या विविध पक्षातील व शहरातील आजी-माजी नगरसेवक एकत्र आल्याचे चित्र नुकतेच दिसून आले. यामुळे शहरातील राजकीय संस्कृतीचे दर्शन यानिमित्ताने जनतेसमोर येऊन चिपळूण ही जिल्ह्याची जशाप्रकारे सांस्कृतिक राजधानी आहे. त्याच प्रकारे राजकारणात मैत्रीपूर्ण संबंध जपणारी नगरी देखील असल्याचे या निमित्ताने दिसून आले.
चिपळूण शहरातील सर्व वेगवेगळ्या पक्षातील प्रतिनिधी आहेत. तरीही आपण मैत्री खातर एकत्र आहोत. आपल्या चिपळूणला सुसंस्कृत शहर म्हणून ओळखलं जातं. आपण तीच परंपरा जपत आहोत, असा संदेश माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे यांनी आयोजित स्नेहभोजनाच्या कार्यक्रमातून दिला. सदरचा कार्यक्रम नगरपालिकेच्या मागील महाविकास आघाडीच्या नगरसेवक, नगरसेविका व प्रमुख पदाधिकाऱ्यांकरिता आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिरीष काटकर, मिलिंद कापडी, राजू देवळेकर, महंमद फकीर, जयंत खताते, अक्षय केदारी, अविनाश हरदारे तसेच माजी नगरसेवक करामत मिठागरी, सौ. संजीवनी शिगवण, सौ. सीमा रानडे, राजेश केळसकर, सौ. फैरोजा मोडक, सौ. जयश्री चितळे, शशिकांत मोदी, बिलाल दिलावर पालकर, सौ. शिवानी पवार, सौ. स्वाती दांडेकर, मनोज शिंदे,सौ. सफा गोठे, कबीर सत्तार काद्री, हारून घारे, सौ.सुषमा कासेकर, सौ.सुरय्या महंमद फकीर, सुधीर शिंदे, सौ वर्षा जागुष्टे, सौ. संजीवनी घेवडेकर, मोहन मिरगल, उमेश सकपाळ, सौ. सई चव्हाण आदी सर्व माजी नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.