अनंत पूजनासह शेषशाही नाग, वनऔषधी, आयुर्वेद व सप्तर्षी पूजनाचा सोहळा
दोडामार्ग – प्रतिनिधी
दोडामार्ग येथील साई मंदिरात उद्या, गुरुवार दि. २५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक परंपरा, अध्यात्म आणि निसर्गाशी असलेले नाते अधोरेखित करणाऱ्या या उत्सवात विविध पूजन विधी पार पडणार आहेत.
उत्सवानिमित्त अनंत पूजन, शेषशाही नाग पूजन, वनऔषधी पूजन, आयुर्वेद पूजन, दोरेक पूजन तसेच सप्तर्षी पूजन करण्यात येणार आहे. यानंतर विविध धार्मिक विधींसह उत्सव सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे.
हा उत्सव सकाळी ११ वाजता सुरू होऊन संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू राहणार आहे. अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने आयोजित या धार्मिक सोहळ्याला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पूजन व उत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन दादा साई यांनी केले आहे.
श्रद्धा, भक्ती आणि निसर्गपूजेचा सुंदर संगम असलेल्या या उत्सवामुळे दोडामार्ग परिसरात उद्या दिवसभर भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.












